मला पुन्हा शाळेत जायचंय....




मला पुन्हा शाळेत जायचंय
नव्या वाटेवर जगात असताना
जुन्या वाटेवर रमून बसायचय...

शाळेत लवकर जाऊन सुरपाटाच्या तो खेळ पुन्हा खेळायचाय,
रॅम्पची पकडापकडी खेळता खेळता पुन्हा खर्चटून घायचंय ,
म्हणून मला पुन्हा शाळेत जायचंय..

पावसाचं पाणी वर्गात आल्यावर टेबलावर बसून राहायचंय ,
शाळेत साचलेल्या तळ्यातून मनसोक्त धावायचंय,
जोडीसाखळी खेळता खेळता पुन्हा घसरून पडायचंय..

मराठीच्या तासाला कवितांना चाली लावत एकसुरात म्हणायचंय ,
इंग्लिश च्या तासाला spelling  पाठ करायचेत ,
गणिताच्या तासाला पाढे पाठ करायचेत ,
म्हणून मला पुन्हा शाळेत जायचंय..

कार्यानुभवाचे उपक्रम पून्हा पून्हा करायचेत
चित्रकलेच्या वहीत पहिलं चित्र निसर्गाचं काढायचय,
४ वाजल्यावर खळायला जाण्यासाठी सरांना पुन्हा convince  करायचंय ,

ग्रुप ने पुन्हा शिष्यवृत्तीसाठी अभ्यास करायचंय ,
अभ्यासाच्या नावाखाली terrace वर मस्ती करायचीय
सर आले म्हणून kitchen  मध्ये लपून बसायचंय,
म्हणून मला पुन्हा शाळेत जायचंय..

शनिवार ची ती शाळा मैदानावरच भारवायचीये
कोवळ्या त्या उन्हात पुन्हा शिकायचंय

आजच्या टेन्शन च्या जगात शाळेतले ते दिवस मनसोक्त जगायचेत,
अन केलेली ती मस्ती पुन्हा अनुभवायचीय ..
म्हणून मला पुन्हा शाळेत जायचंय......





✍ - Adorable 

Comments