Posts

Showing posts from June, 2020

सांजवेळ

तुझ्या सोबतीची एक सांजवेळ यावी, त्या निळाईत दोन गात्रे विरघळून जावी.. तुझ्या दुलईत रेशीमवारा गुणगुणावा, अशी संध्याकाळ तुझ्याच डोळ्यांनी पहावी....😍

कोहिनूर हिरा

आयुष्याच्या वाटेवर सापडलेला तू म्हणजे कोहिनूर हिरा,   सगळ्यांना मित्र मिळावा तो तुझ्यासारखा खरा आहेस तू तेवढाच प्रेमळ,  जेवढं तुझं मन निरमळ  तुझा राग म्हणजे एक ते चार  ते संपलं की समोरच्याची वाट लागते पार.. आयुष्यातला माझ्या प्रत्येक क्षणाचा आहेस तू साक्षीदार  कसं सांगू मी तुला तुझा मज वाटतो खुप आधार, तुझ्याकडे मन हलकं केलं की मनाला मिळतो वेगळा विसावा  इतकंच वाटतं या जिवाला तू नेहमी हसत दिसावा.. 😊😊

एक विचार : स्वतः मधील 'स्व' शोधण्याचा

एक विचार : स्वतः मधील 'स्व' शोधण्याचा रोज छोट्याश्या मनात हजारोनी गर्दी करणाऱ्या या विचारामधून एक विचार शोधण  म्हणजे अलिबाबाच्या खजिन्यामधून अल्लाउदादीनचा चिराग शोधण्यासारखा आहे.  आणि एकदा का हा चिराग सापडला तर " सारी कायनात आपके सामने हाजिर है "। म्हणूनच खूप शोधून शोधून सापडला मला हा विचार, स्वतःमधील 'स्व' शोधण्याचा.   शिवाजी महाराज यांनी सुद्धा स्वतामधील 'स्व' शोधला, त्यात स्व' का स्वताच स्वप्न बनवले  आणि त्यातूनच साकारले "स्वराज्य", "स्व"  फक्त एक अक्षरी शब्द पण ज्याला पण हा प्राप्त झाला त्याचा अर्थच फार वेगळा झाला,  अर्थच बदलून गेला.  स्वतामधील 'स्व' शोधन म्हणजे तरी काय बर नेमके? माझ्या मते, आपल्यातील सर्वोत्तम  करुन दाखविण्याची ताकद, इच्छाशक्ती म्हणजे 'स्व' ! एकदा का प्रत्येकाला आपल्यामधील  बलस्थानांची जाणीव झाली, स्वतामधील ताकद समजली तर जगालले सारे प्रश्न आपोआप सुटतात.  माणसाला स्वतः मधील ताकद समजली कि त्याची प्रगती ही होत राहते, आणि माणूस पुढे गेला,  सर्वोच्य पदावर गेला म...