Posts

Showing posts from May, 2020

तु 💕

Image
तुझ्याशी बोलायला लागले की  मी स्वतःच इतकी हरवून जाते तुझ्याशी बोलायचं नाही हे ठरवलेलं सुद्धा विसरून जाते, तुझ्या गोड आठवणीत  होऊन जाते मी बेधुंद त्या आठवणीतून वेगळाच दरवळत असतो सुगंध, सोबत तू नसला तरी माझ्या हृदयात तू आहेस बोलत तू नसला तरी माझ्या प्रत्येक वाक्यात तू आहेस, तुझ्या सोबतीची गरज आहे माझ्या या निष्पाप प्रेमाला  तुझ्यासोबत जगण्याची आस आहे तुझ्यासाठी धडधडणार्या या हृदयाला... 💕 ✍ - Adorable

वाऱ्याची झुळूक

वाऱ्याची ती मंद झुळूक मनाला स्पर्श करून गेली गोंधळलेल्या त्या मनाला हलकासा दिलासा देऊन गेली... माझ्यातला हरवलेल्या मी ला . पुन्हा नव्याने रंगवून गेली. मनात खोलवर रुजलेल्या भावनाना जराशी सोबत देऊन गेली... भरकटलेल्या त्या मनाला हळुवारपणे सावरून गेली.  दुःख पिळवटून बसलेल्या त्या मनाला सुखाचे काही क्षण दाखवून गेली.. जाता जाता मात्र त्याच जिवाला जिवाचे जिवलग बनवून गेली... ✍ - Adorable 

आयुष्याचा प्रवास

Image
आयुष्य म्हणजे  जन्मापासून ते मृत्युपर्यंत  रंगवलेली पुस्तकं...  आता त्या पुस्तकांच्या  पानांवर काय लिहायचं तो ज्याच्या त्याच्या नशीबाचा खेळ.  म्हणलं तर तीच पानं  रंगवायला खूप सोप्पी असतात अन म्हणलं तर  तितकीच अवघड... त्यावर मनासारखे रंग भरले तर,  फुलपाखरासारख  रंगीबेरंगी दिसायला लागतं...  वाईट दिवस सगळ्यांचेच  येतात, म्हणून पुस्तक  बंद न करता, नवीन पानावर सुरुवात  करायची असते... आयुष्य जगून समजते,  केवळ वाचून, ऐकून, बघून समजत नाही... ✍ - Adorable 

मला पुन्हा शाळेत जायचंय....

Image
मला पुन्हा शाळेत जायचंय नव्या वाटेवर जगात असताना जुन्या वाटेवर रमून बसायचय... शाळेत लवकर जाऊन सुरपाटाच्या तो खेळ पुन्हा खेळायचाय, रॅम्पची पकडापकडी खेळता खेळता पुन्हा खर्चटून घायचंय , म्हणून मला पुन्हा शाळेत जायचंय.. पावसाचं पाणी वर्गात आल्यावर टेबलावर बसून राहायचंय , शाळेत साचलेल्या तळ्यातून मनसोक्त धावायचंय, जोडीसाखळी खेळता खेळता पुन्हा घसरून पडायचंय.. मराठीच्या तासाला कवितांना चाली लावत एकसुरात म्हणायचंय , इंग्लिश च्या तासाला spelling  पाठ करायचेत , गणिताच्या तासाला पाढे पाठ करायचेत , म्हणून मला पुन्हा शाळेत जायचंय.. कार्यानुभवाचे उपक्रम पून्हा पून्हा करायचेत चित्रकलेच्या वहीत पहिलं चित्र निसर्गाचं काढायचय, ४ वाजल्यावर खळायला जाण्यासाठी सरांना पुन्हा convince  करायचंय , ग्रुप ने पुन्हा शिष्यवृत्तीसाठी अभ्यास करायचंय , अभ्यासाच्या नावाखाली terrace वर मस्ती करायचीय सर आले म्हणून kitchen  मध्ये लपून बसायचंय, म्हणून मला पुन्हा शाळेत जायचंय.. शनिवार ची ती शाळा मैदानावरच भारवायचीये कोवळ्या त्या उन्हात पुन्हा शिकायचंय आजच्या टेन्शन च्या जगात ...

Z P शाळा

Image
आयुष्याला कलाटणी देणारे ते अविस्मरणीय दिवस , जगण्यातला आनंद लुटायला शिकवणारी हीच ती शाळा , जिथून आयुष्याचे धडे शिकायला सुरवात झाली . खूप साऱ्या आठवणी आज  तितक्याच मनात घर करून राहिल्यात . हीच ती जागा , जिथे ७ वर्षाचा प्रवास  एका वाऱ्याच्या मंद लहरी सारखा निघून गेला .. ✍ - Adorable