Posts

Showing posts from February, 2025

कधी एकदा...

 कधी एकटा नदीच्या किनारी, संथ मनाची खळखळ पाहतो. तुला भेटण्या चालले होडीतून, नाविका मनाची तळमळ पाहतो. झुळूक वाऱ्यासम हास्य तुझे, फुलझाड मनाची सळसळ पाहतो. जवळ ठेऊनी जपण्या तुजला, शिंपल्या मनाची कळकळ पाहतो. पैलतीरी शांत दिसतेस तू, एल मनाची झळझळ पाहतो. कधी एकटा नदीच्या किनारी, संथ मनाची खळखळ पाहतो....

घेऊन फोन उशाशी

 घेऊन फोन उशाशी मी झोप दूर केली, बोलता बोलता तुझ्याशी रात्र दिवस केली. असा अवतरला सूर्य क्षितिजावर जशी तू येतेस समोर अन् लाल बुंद झाले आकाश, सुरू नवा प्रेम प्रहर. माझ्या श्वासात मिसळलेला वारा मधल्या मधे खुश होता, झुळूक बनून तुझ्याशी तो, अंगचटीला ला येत होता खणाणून वाजला गजर  खडाडून जागा झालो, घेऊन फोन उशाशी मी स्वप्ने भंग केली..