Posts

Showing posts from January, 2025

शोध स्वतःचा...

दुसऱ्यांवर लिहिता लिहिता स्वतःवर लिहायचं राहूनच गेलेलं... कधीतरी आपणच आपल्याला कैद करुन ठेवावं आपल्याच लिखाणात... कधी हसणं कधी रडणं तर कधी स्वतःलाच रडवण  कधी स्वतःच हरवण अन परत मीच मला शोधत बसणं....  कधी पडणं तर कधी सगळ संपलेल असतानाही स्वतःला सावरण चुका करणं अन् त्यातून काहीतरी शिकणं... कधी कधी तर मीच मला इतका त्रास द्यावा की कधीच न संपणारे प्रश्न उभे राहावेत  आपणच प्रश्न तयार करायचे न आपणच उत्तरे शोधायची.... कधी  कधी ते शून्यात हरवण अन् परत नॉर्मल स्टेज ला येणं विचारांना मी आवडते अन् मला विचार  दोघांचही एकमेकांशिवाय जगणं अपूर्णच ... वाटेल ते वाटेल तस् अन् वाटेल तेवढं लिहीत बसायचं  अन् स्वतःच्या मनातलं लिहून मोकळं व्हायचं... रोज स्वतःला ४ बाय ४ च्या फ्रेम मध्ये कैद करून ठेवणं  मग ते हसणं असो वा रडणं वा झोपतले फोटोज  अन् कालांतराने तेच बघून त्यात हरवून जाणं... कधीकधी आपलंच आपल्याला नको इतकं अप्रूप वाटावं  मग आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची  रोज नव्याने स्वतःच्याच प्रेमात बुडून जायचं अथांग  अन् मग परत लागायचं नवीन वाटेला  स्वतःच्या...

तू माझ्यासाठी....

तू कोण आहेस माझ्यासाठी  हे तुला सांगावच लागेल का  तुझ्या सावलीची जागा मी घेतलीये  ती तुला दाखवावीच लागेल का ? तुझ्यामध्ये ते सर्व काही आहे  जे मला पाहिजे होत  हृदयातला स्पंद, नात्यातला गंध  अन् मला हवा तसाच आहे आपला अनुबंध  तू खूप दूर आहेस  पण तुझा भास तर आहे  एकाकी का असेना  जगण्याची आस तर आहे  तू दूर असलास तरी  तुझी आठवण तर आहे  काही नसल तरी  या हृदयात तुझ्या प्रेमाची साठवण तर आहे  तू माझ्यासाठी कोण आहेस  ते तुला सांगावच लागेल का....? ✍ - Adorable 

डायरी (रोजनिशी)

 नसेल आपल कोणी का लावून घ्यायचं मनी || बंद करून ठेवावं स्वतः ला आपल्या लिखाणाच्या रोजनिशीत मनातल्या शब्दांना मोकळीक देऊनी अलगदपणे त्यात टिपत राहावं कधी हास्याचा झरा वाहवा कधी अश्रृंना पाझर फुटावा आपणच आपल्याला सावरता सावरता विचारांचा गुंता सोडवत जावा भावनांना मायेचा स्पर्श करुनी पेनाच्या शाईने गिरवून टाकाव एकेक पान उलगडत हळूच तिला उराशी घ्यावं नसेल आपल कोणी का लावुन घ्यायच मनी  कोणी असो वा नसो हाती आपली रोजनिशीच बरी !!!