आयुष्याचा प्रवास
आयुष्य म्हणजे
जन्मापासून ते मृत्युपर्यंत
रंगवलेली पुस्तकं...
आता त्या पुस्तकांच्या
पानांवर काय लिहायचं
तो ज्याच्या त्याच्या
नशीबाचा खेळ.
म्हणलं तर तीच पानं
रंगवायला खूप सोप्पी
असतात अन म्हणलं तर
तितकीच अवघड...
त्यावर मनासारखे रंग
भरले तर,
फुलपाखरासारख
रंगीबेरंगी दिसायला
लागतं...
वाईट दिवस सगळ्यांचेच
येतात, म्हणून पुस्तक
बंद न करता, नवीन
पानावर सुरुवात
करायची असते...
आयुष्य जगून समजते,
केवळ वाचून, ऐकून, बघून समजत नाही...
✍ - Adorable

Comments
Post a Comment