तु 💕





तुझ्याशी बोलायला लागले की 
मी स्वतःच इतकी हरवून जाते
तुझ्याशी बोलायचं नाही हे
ठरवलेलं सुद्धा विसरून जाते,

तुझ्या गोड आठवणीत 
होऊन जाते मी बेधुंद
त्या आठवणीतून वेगळाच
दरवळत असतो सुगंध,

सोबत तू नसला तरी
माझ्या हृदयात तू आहेस
बोलत तू नसला तरी
माझ्या प्रत्येक वाक्यात तू आहेस,

तुझ्या सोबतीची गरज आहे
माझ्या या निष्पाप प्रेमाला 
तुझ्यासोबत जगण्याची आस आहे
तुझ्यासाठी धडधडणार्या या हृदयाला... 💕





✍ - Adorable






Comments