वाऱ्याची झुळूक




वाऱ्याची ती मंद झुळूक
मनाला स्पर्श करून गेली

गोंधळलेल्या त्या मनाला
हलकासा दिलासा देऊन
गेली...

माझ्यातला हरवलेल्या मी ला .
पुन्हा नव्याने रंगवून गेली.

मनात खोलवर रुजलेल्या भावनाना
जराशी सोबत देऊन गेली...

भरकटलेल्या त्या मनाला
हळुवारपणे सावरून गेली.

 दुःख पिळवटून बसलेल्या
त्या मनाला सुखाचे काही क्षण
दाखवून गेली..

जाता जाता मात्र त्याच
जिवाला
जिवाचे जिवलग बनवून
गेली...




✍ - Adorable 

Comments