एक विचार : स्वतः मधील 'स्व' शोधण्याचा
एक विचार : स्वतः मधील 'स्व' शोधण्याचा
रोज छोट्याश्या मनात हजारोनी गर्दी करणाऱ्या या विचारामधून एक विचार शोधण
म्हणजे अलिबाबाच्या खजिन्यामधून अल्लाउदादीनचा चिराग शोधण्यासारखा आहे.
आणि एकदा का हा चिराग सापडला तर "सारी कायनात आपके सामने हाजिर है "।
म्हणूनच खूप शोधून शोधून सापडला मला हा विचार, स्वतःमधील 'स्व' शोधण्याचा.
शिवाजी महाराज यांनी सुद्धा स्वतामधील 'स्व' शोधला, त्यात स्व' का स्वताच स्वप्न बनवले
आणि त्यातूनच साकारले "स्वराज्य",
"स्व" फक्त एक अक्षरी शब्द पण ज्याला पण हा प्राप्त झाला त्याचा अर्थच फार वेगळा झाला,
अर्थच बदलून गेला.
स्वतामधील 'स्व' शोधन म्हणजे तरी काय बर नेमके? माझ्या मते, आपल्यातील सर्वोत्तम
करुन दाखविण्याची ताकद, इच्छाशक्ती म्हणजे 'स्व' ! एकदा का प्रत्येकाला आपल्यामधील
बलस्थानांची जाणीव झाली, स्वतामधील ताकद समजली तर जगालले सारे प्रश्न आपोआप सुटतात.
माणसाला स्वतः मधील ताकद समजली कि त्याची प्रगती ही होत राहते, आणि माणूस पुढे गेला,
सर्वोच्य पदावर गेला म्हणजे तो कधी एकटा जात नसतो, त्या सोबत चाललोल असतो एक समाज,
एक कुटुंब , एक राज्य आणि एक देश.
देशातील लोकांमुळे देशाची ओळख होत असते.
स्व' शोधण्यासाठी कोणत्याहि शिक्षणाची गरज नाही. गरज आहे ती फक्त आपण आपल्याला घडविण्याची, आपल्यातील गुण ओळखण्याची त्याला योग्य दिशा देण्याची आणि त्याला माणुसकी ची ओढ ठेवण्याची..
धन्यवाद !
I am proud of... खूप छान विचार मांडले आहेस नक्कीच हे वाचून सगळे स्वतः मधील स्व शोधण्याचा प्रयत्न करतील.आणि तुला खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteतुझी मैत्रीण....