कोहिनूर हिरा
आयुष्याच्या वाटेवर सापडलेला तू म्हणजे कोहिनूर हिरा,
सगळ्यांना मित्र मिळावा तो तुझ्यासारखा खरा
आहेस तू तेवढाच प्रेमळ,
जेवढं तुझं मन निरमळ
तुझा राग म्हणजे एक ते चार
ते संपलं की समोरच्याची वाट लागते पार..
आयुष्यातला माझ्या प्रत्येक क्षणाचा आहेस तू साक्षीदार
कसं सांगू मी तुला तुझा मज वाटतो खुप आधार,
तुझ्याकडे मन हलकं केलं की मनाला मिळतो वेगळा विसावा
इतकंच वाटतं या जिवाला तू नेहमी हसत दिसावा.. 😊😊
Comments
Post a Comment