डायरी (रोजनिशी)
नसेल आपल कोणी का लावून घ्यायचं मनी ||
बंद करून ठेवावं स्वतः ला आपल्या लिखाणाच्या रोजनिशीत
मनातल्या शब्दांना मोकळीक देऊनी अलगदपणे त्यात टिपत राहावं
कधी हास्याचा झरा वाहवा कधी अश्रृंना पाझर फुटावा
आपणच आपल्याला सावरता सावरता विचारांचा गुंता सोडवत जावा
भावनांना मायेचा स्पर्श करुनी पेनाच्या शाईने गिरवून टाकाव
एकेक पान उलगडत हळूच तिला उराशी घ्यावं
नसेल आपल कोणी का लावुन घ्यायच मनी
कोणी असो वा नसो हाती आपली रोजनिशीच बरी !!!
Comments
Post a Comment