तू माझ्यासाठी....
तू कोण आहेस माझ्यासाठी
हे तुला सांगावच लागेल का
तुझ्या सावलीची जागा मी घेतलीये
ती तुला दाखवावीच लागेल का ?
तुझ्यामध्ये ते सर्व काही आहे
जे मला पाहिजे होत
हृदयातला स्पंद, नात्यातला गंध
अन् मला हवा तसाच आहे आपला अनुबंध
तू खूप दूर आहेस
पण तुझा भास तर आहे
एकाकी का असेना
जगण्याची आस तर आहे
तू दूर असलास तरी
तुझी आठवण तर आहे
काही नसल तरी
या हृदयात तुझ्या प्रेमाची साठवण तर आहे
तू माझ्यासाठी कोण आहेस
ते तुला सांगावच लागेल का....?
✍ - Adorable
Comments
Post a Comment