शोध स्वतःचा...
दुसऱ्यांवर लिहिता लिहिता स्वतःवर लिहायचं राहूनच गेलेलं...
कधीतरी आपणच आपल्याला कैद करुन ठेवावं आपल्याच लिखाणात...
कधी हसणं कधी रडणं तर कधी स्वतःलाच रडवण
कधी स्वतःच हरवण अन परत मीच मला शोधत बसणं....
कधी पडणं तर कधी सगळ संपलेल असतानाही स्वतःला सावरण
चुका करणं अन् त्यातून काहीतरी शिकणं...
कधी कधी तर मीच मला इतका त्रास द्यावा की कधीच न संपणारे प्रश्न उभे राहावेत
आपणच प्रश्न तयार करायचे न आपणच उत्तरे शोधायची....
कधी कधी ते शून्यात हरवण अन् परत नॉर्मल स्टेज ला येणं
विचारांना मी आवडते अन् मला विचार
दोघांचही एकमेकांशिवाय जगणं अपूर्णच ...
वाटेल ते वाटेल तस् अन् वाटेल तेवढं लिहीत बसायचं
अन् स्वतःच्या मनातलं लिहून मोकळं व्हायचं...
रोज स्वतःला ४ बाय ४ च्या फ्रेम मध्ये कैद करून ठेवणं
मग ते हसणं असो वा रडणं वा झोपतले फोटोज
अन् कालांतराने तेच बघून त्यात हरवून जाणं...
कधीकधी आपलंच आपल्याला नको इतकं अप्रूप वाटावं
मग आपणच आपली पाठ थोपटून घ्यायची
रोज नव्याने स्वतःच्याच प्रेमात बुडून जायचं अथांग
अन् मग परत लागायचं नवीन वाटेला
स्वतःच्या शोधात....!!!!
✍ - Adorable
Comments
Post a Comment