घेऊन फोन उशाशी
घेऊन फोन उशाशी
मी झोप दूर केली,
बोलता बोलता तुझ्याशी
रात्र दिवस केली.
असा अवतरला सूर्य क्षितिजावर
जशी तू येतेस समोर
अन् लाल बुंद झाले आकाश,
सुरू नवा प्रेम प्रहर.
माझ्या श्वासात मिसळलेला वारा
मधल्या मधे खुश होता,
झुळूक बनून तुझ्याशी तो,
अंगचटीला ला येत होता
खणाणून वाजला गजर
खडाडून जागा झालो,
घेऊन फोन उशाशी
मी स्वप्ने भंग केली..
Comments
Post a Comment