कधी एकदा...
कधी एकटा नदीच्या किनारी,
संथ मनाची खळखळ पाहतो.
तुला भेटण्या चालले होडीतून,
नाविका मनाची तळमळ पाहतो.
झुळूक वाऱ्यासम हास्य तुझे,
फुलझाड मनाची सळसळ पाहतो.
जवळ ठेऊनी जपण्या तुजला,
शिंपल्या मनाची कळकळ पाहतो.
पैलतीरी शांत दिसतेस तू,
एल मनाची झळझळ पाहतो.
कधी एकटा नदीच्या किनारी,
संथ मनाची खळखळ पाहतो....
Comments
Post a Comment